


अमृतवाणी
स्वार्थ शिकवावा लागत नाही, पण परमार्थ मात्र शिकवावा लागतो. जो केल्याने आयुष्यात सर्व गोष्टी साध्य करता येतात, पैसे देखील जो तुमच्या आयुष्यात अती महत्वाचा आहे.
परमार्थाने ईश्वरी शक्तीचा अनुभव घेता येतो ज्या साठी कुठल्याही साधनेची आवशक्यता नाही ना पैश्याची.

समाज कार्य.












श्री दीपक दादा.

दीपक जनार्दन खडके, वय ६२, जन्म नागपूर, शिक्षण पदवी पर्यंत. वयाच्या १७ व्या वर्षांपासून जीवन प्रवासाला सुरुवात. अनेकविध नोकऱ्या व व्यवसाय करताना समोर येणाऱ्या प्रत्येकाचे विविध अंगाने अवलोकन व आयुष्यात घडणाऱ्या प्रत्येक घटनेचा आपल्या आयुष्याशी असलेला संबंध व त्यामागे नियतीचे प्रयोजन व त्यात डोकावण्याचा स्वभाव.मी घडत असतांना नियतीने जशी चांगल्या लोकांची व्यवस्था माझ्या आजूबाजूला केली होती, तसेच वाईट प्रवृत्तीच्या लोकांचाही माझ्या आयुष्यात सतत वावर होता. तेव्हा तुकाराम महाराजांची ओवी ‘निंदकाचे घर असावे शेजारी’ आठवत असे. कदाचित याच लोकांमुळे मी हि अध्यात्मिक उंची गाठू शकलो. यामुळे आयुष्याला मिळालेली कलाटणी यात नियती व ईश्वरी संकेतांची सतत होणारा मानसिक संघर्ष. यातूनच आयुष्यात गुरुचे आगमन व त्यांच्या चरणी समर्पण, त्यामुळे ‘आत्मा- मन व मेंदू’ यांच्यात चालणार सततचा संघर्ष व मी कोण व का? ह्या प्रश्नांची मिळालेली उत्तरे, त्यातून ‘ईश्वर, गुरु आणि शिष्य’ या त्रयींच्या अस्तित्वाबद्दलची उत्कंठा. अध्यात्मिक उंची गाठलेल्या अनेक जाती, धर्माचे, योगी, संत-महात्मे अवलिया यांचेशी आलेला संपर्क व त्यांच्या आशीर्वादाने व मार्गदर्शनाने गेल्या २४ वर्षात व्यवहारिक व आध्यत्मिक अनुभूतीतून आलेली प्रचिती व त्यातूनच ‘गुरु शोधावा का?’ चे प्रयोजन .